विलवडेत हाँट मिक्सर वाहणार्‍या ट्रँक्टरला अपघात

बांदा (प्रतिनिधी) : बांदा दाणोली मार्गावर  विलवडे खांबलेश्वर मंदिर जवळ दुसर्‍या वाहनाला बाजू देताना चालकाचा ताबा सुटून रस्त्यालगत दलदलीत जाऊन ट्रँक्टर अपघातगस्त झाला. वाहन चालक जखमी झाल्याने तो काही वेळ बेशुध्द होता. स्थानिक ग्रामस्थ व सरपंच प्रकाश दळवी अपघात स्थळी धाव घेत दवाखान्यात उपचारासाठी पाटविण्यात आले. या अपघातात ट्रँक्टरचे किरकोळ नुकसान झाले. हा अपघात मंगळवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडला.याबाबत बांदा पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल नव्हती.

मंगळवारी दुपारी चालक हा ओटवणे येथून बांदाच्या दिशेने दोडामार्ग येथे रस्त्याच्या कामासाठी  ट्रँक्टरला हाँट मिक्सर जोडून घेऊन जात होता. विलवडे  खांबलेश्वर मंदिर जवळ दुसर्‍या वाहनाला बाजू देताना वाहन चालकांचा ताबा सुटून रस्त्यालगत दलदलीत ट्रक्टर अपघातग्रस्त झाला. गेल्या आठवड्यात वाफोली डोंगरीकर हाँटेल जवळ उतार व वळणावर रस्त्याचा अंदाज न आल्याने ट्रक कलंडून अपघातग्रस्त झाला होता. सदर रस्त्यांचे खड्डेमुक्त झाल्याने वाहन चालक सुसाट वेगात जात आहेत. वेग मर्यादा नियत्रंणात नसल्याने हा अपघात झाल्याचे विलवडे सरपंच प्रकाश दळवी यांनी सांगितले.

बांदा-दाणोली जिल्ह‍ामार्गा हा खड्डेमुक्त झाला असला तरी काही ठिकाणी रस्ता अरुंद व वळणावळणाचा,सहा गाव,अनेक शाळा आहेत. तसेच खडी वाहतूक करणारे डंपर, मालवाहतूक करणारे ट्रक,अवजड वाहने, यामुळे  हा रस्ता अपघाताला नेहमीच निमत्रंण देत आहे.रस्त्यावर साईड पट्ट्यांवर सफेद पट्टे मारणे,गतिरोधक असलेल्या ठिकाणी रिफ्लेक्टर्स लावणे, आवश्यक त्या ठिकाणी रंबल्स लावणे, दिशादर्शक, चिन्ह दर्शक वेग मर्यादा फलक लावणे अत्यआवश्यक आहे. 

error: Content is protected !!