कणकवली (प्रतिनिधी) : सन २०१२ पासून सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नितेश राणे यांच्या संकल्पनेतुन सुरु झालेल्या “ व्हच्युओसीक ” या कोकणातील सर्वात मोठया टेक्निकल फेस्टीव्हलचे आयोजन सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली येथे दिनांक दिनांक ५ एप्रिल २०२४ व ६ एप्रिल २०२४ या कालावधीत करण्यात येत आहे.
हे “व्हच्युओसीक २०२४” हे टेक्निकल फेस्टीव्हल म्हणजे महाराष्ट्रातील इंजिनीअरींगचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसहीत शेजारील गोवा व कर्नाटक राज्यातील इंजिनीअरींगचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक पर्वणीच आहे. त्याच बरोबर सिंधुदुर्ग जिल्हयातील इयत्ता ८ वी, ९ वी, १० वी च्या विद्यार्थ्यांमध्ये इंजिनीअरींग बददल जिज्ञासा वाढऊन या माध्यमातुन त्यांचा इंजिनीअरींगकडे ओढा वाढवून जास्तीत जास्त प्रतिभावंत इंजिनीअर निर्माण व्हावे यासाठीचे हे एक पाऊल आहे.
या टेक्निकल फेस्टीव्हल मध्ये इव्होल्युशन २०२४ ही शोधनिबंध स्पर्धा, डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रोजेक्ट एक्झीबीशन स्पर्धा व प्रश्नमंजुषा स्पर्धा, पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा, रोबोटीक्स , रोबोसॉकर स्पर्धा, मॉक टेस्ट, इयत्ता ८ वी, ९ वी, १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रदर्शन स्पर्धा, डिबेट स्पर्धा, लॅन गेमींग, इंजिनीअरींग डिग्री विद्यार्थ्यांचे प्रोजेक्ट एक्झीबीशन, डॉक्युमेंट्री स्पर्धा डिरेक्टो यासह अनेक लहान-मोठया स्पर्धांचे आयोजन केले आहे जेणेकरुन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, या कार्यक्रमामध्ये असलेल्या स्पर्धांसाठी लाखो रुपयांची बक्षिसे ठेण्वण्यात आली आहेत.
महाविद्यालयाचे सचिव सन्मा. नितेशजी राणे यांच्या संकल्पनेतील “व्हच्युओसीक २०२४” या कार्यक्रमासाठी प्र. प्राचार्य डॉ. महेश साटम व प्रशासकीय अधिकारी श्री. शांतेश रावराणे यांच्या मार्गदर्शनाखाली संयोजक म्हणून महाविद्यालयाच्या इलेक्ट्रीकल विभागाचे प्राध्यापक श्री. इम्रान पटेल व कॉम्पुटर सायन्स इंजिनिअरींग( ए आय एम एल) विभागाचे प्राध्यापक श्री. तुषार मालपेकर हे काम पाहत आहेत.
“व्हच्युओसीक २०२४” मध्ये महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक राज्यातील जास्तीत विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य, प्रशासकीय अधिकारी, “व्हच्युओसीक २०२४” चे संयोजक, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व सर्व विद्यार्थी वर्ग यांनी केले आहे.












