ऍड. मिलिंद सावंत यांच्या युक्तीवादाला यश
कणकवली (प्रतिनिधी) : नांदगाव मध्ये रविराज मोरजकर व त्यांचा भाऊ भुपेंद्र यांना मारहाण केल्याच्या गुन्ह्यात सावंतवाडी जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत असलेले सुरेश अर्जुन माेरये ( वय 62 ) कमलेश सुरेश माेरये ( वय 39 ) दोघे रा. नांदगाव तिठा यांची प्रत्येकी 7 हजार 500 रुपयांच्या सशर्त जामिनावर मुक्तता करण्यात आली. एकूण दोन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर 1 एप्रिल रोजी मोरये बापलेका ला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आरोपींच्या वतीने ऍड. मिलिंद सावंत यांनी तात्काळ जामीन मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज सादर केला. परंतु पोलिसांनी आपले म्हणणे मांडण्यासाठी मुदत मागून घेतली होती. त्यानुसार आज पोलिसांनी आपले म्हणणे मांडले. सरकार पक्षाच्या वतीने जामीन नामंजूर होण्यासाठी मांडलेल्या मुद्द्याना हरकत घेत युक्तिवाद केला. ऍड. मिलिंद सावंत यांच्या यशस्वी युक्तिवादानंतर दोन्ही आरोपींची सशर्त जामिनावर मुक्तता करण्यात आली.












