देशाच्या सेवेसाठी तत्पर,एनसीसी कॅडेट तयार करण्यासाठी प्रयत्नशील– थर्ड ऑफिसर मारुती लाड.

“निलगिरी ट्रेकिंग” (तामिळनाडू ) साठी निवड झालेल्या कॅडेट मानसी लाडचा गौरव !

अनुभव संपन्न प्रशिक्षणाच्या मार्गदर्शनातून प्रशालेतील एनसीसी छात्र नावलौकिक मिळवतील– मुख्या. विजय रासम.

फोंडाघाट (प्रतिनिधी) : सुमारे ६० दिवसाच्या खडतर- कष्टप्राय प्रशिक्षणातून आजचा हा उत्साहवर्धक स्वागत समारंभ, पुढे काम करण्यास ऊर्जा देणारा आहे. भविष्यात माझ्या हातून देशाच्या सेवेसाठी उपयोगी, तत्पर एनसीसी कॅडेट तयार होतील. अशी ग्वाही थर्ड ऑफिसर रँक मिळवून आलेले सहशिक्षक थर्ड ऑफिसर मारुती लाड यांनी देताना, प्रशिक्षणाच्या अनुभवातील प्रसंग कथन केले..

ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी ( कामटी ) येथून प्री कमिशन एनसीसी कोर्स पूर्ण करून आणि एनसीसी थर्ड ऑफिसर रँक मिळवून परतलेल्या,मारुती लाड यांचे सहकारी शिक्षक वर्ग आणि एनसीसी कॅडेट नी मानवंदना देऊन स्वागत केले. याप्रसंगी एनसीसी पास झालेल्या कॅडेट नी प्रशाळेच्या विभागास रायफल भेट दिली. तिचे अनावरण मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.

स्वागत आणि प्रास्ताविकातील मनोगता मध्ये थर्ड ऑफिसर आर्या भोगले यांनी या खडतर प्रशिक्षणाची माहिती सांगितली.सामान्य जीवनापेक्षा वेगळा, शिस्तप्रिय आणि रेजिमेंटल जीवनापासून ऑफिसर पर्यंतचा खडतर प्रवास त्यांनी उलगडून सांगितला. लेफ्ट. ताडेराव यांनी, कुटुंब, शाळा, सहकारी, विद्यार्थी या सर्वांपासून दूर राहून मारुती लाड यांनी पूर्ण केलेल्या प्रशिक्षणाचे कौतुक केले. कॅडेटच्या वतीने आर्या खरात ने शुभेच्छा देऊन मनोगत व्यक्त केले. मारुती लाड सरांकडून मिळालेल्या प्रशिक्षणाच्या अनुभवातून निर्माण झालेले कॅडेट्स प्रशालेचे नाव उंचावतील, असा विश्वास व्यक्त करून मुख्याध्यापक विजय रासम यांनी लाड यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी ५८ महाराष्ट्र बटालियन सिंधुदुर्ग कडून ” निलगिरी ट्रेकिंग ” (तामिळनाडू ) साठी निवड झालेल्या कॅडेट मानसी लाड हीचे सर्वांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या…

संचालकवर्ग,क्रीडा शिक्षक देठे,पर्यवेक्षक प्रसाद पारकर, स्नेहा रेवडेकर, शिक्षकवर्ग, कर्मचारीवर्ग आणि एनसीसी कॅडेट उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा जॉईल सर यांनी तर आभार प्रदर्शन अजिंक्य पोकळे यांनी केले….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!