सावंतवाडी इनरव्हील ची भूतदया

नरेंद्र डोंगरावरील पशु पक्षाना पाण्यासाठी केली भांड्यांची सोय

सावंतवाडी (प्रतिनिधी) : नरेंद्र डोंगरावर स्थिरावलेल्या प्राणी आणि पक्ष्यांना जंगलातच पाणी मिळावे यासाठी सावंतवाडीच्या इनरव्हील क्लबने पुढाकार घेतला आहे. यासाठी आवश्यक असलेली भांडी त्यांनी वनविभागाकडे सुपूर्द केली आहेत. जंगल परिसरात पाण्याची सोय नसल्यामुळे त्याठिकाणी असलेले प्राणी व पक्षी मोठ्या प्रमाणात भरवस्तीत येतात त्यामुळे हा उपक्रम राबविण्यात आला आहे, असे अध्यक्षा रिया रेडीज यांनी सांगितले. त्यांनी राबविलेल्या उपक्रमाचे वनअधिकारी मदन क्षीरसागर यांनी कौतूक केले.

यावेळी मिना जोशी, शुभदा करमरकर, मिनल नाईक, साधना रेगे, प्राची देसाई, दर्शना देसाई, सुमेधा धुरी, उषा परब आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!