उमेदवारी दिल्यास लढणार आणि जिंकणार ; सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघ भाजपाचा

अन्य कोणी लुडबुड करू नये

केंद्रीय मंत्री राणेंचा मित्रपक्षांना इशारा

मुंबई (ब्युराे न्युज) : रत्नागिरी मतदारसंघ हा भाजपाचा आहे, भाजपाच हा मतदारसंघ लढणार. उमेदवार कोण असेल हे पक्ष सांगणार. यामध्ये कोणीही लुडबुड करू नये. मी नाव मागे घेतलेलं नाही. व मी कुणाशी बोलायला देखील गेलेलो नाही. माझ्याही नेत्यांना मी तिकीट द्या असं बोलायला गेलेलो नाही. या मतदारसंघात भाजपाने माझं नाव जाहीर केल्यास मी निवडणूक लढणार व मी जिंकणार असा ठाम विश्वास केंद्रीय मंत्री यांनी आजच्या मुंबईतील पत्रकार परिषदेत व्यक्त केला. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी मध्ये आपल्या पक्षाची बैठक बोलावली असल्याकडे पत्रकारांनी राणेंचे लक्ष वेधले असता प्रत्येक पक्षाला तो अधिकार आहे. आम्ही पण उद्या बैठक बोलावली आहे. मी पण जिल्ह्यात चाललो आहे. आमच्याकडे कोकणात गावागावात दहीकाला होतो तसा तो उदय सामंत यांच्याकडे व आमच्याकडे होणार. पण या दहीकाल्यात संकासुर कोण असणार? हे मला माहिती नाही असा मिश्किल टोला देखील राणे यांनी लगावला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपाच्या सगळ्या नगरपालिका, जिल्हा बँक, जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था च्या सत्ता भाजपाकडे आहेत. ही आमची भाजपाची ताकद असताना आम्ही हा मतदारसंघ सोडणार का? असा प्रती सवाल त्यांनी केला. यावेळी राणेंनी उदय सामंत यांचा उमेदवार कोण? त्याचं मला नाव सांगा असा सवाल करताच पत्रकारांनी किरण सामान हे इच्छुक उमेदवार असल्याचे सांगितले. त्यावर राणेंनी “अरे बापरे” करत हात जोडले. परंतु त्यांच्या नावाला माझा विरोध नाही. परंतु येथे भाजपाचा उमेदवार असणार, असे देखील राणे यावेळी ठासून बोलले. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात कुणाच वजन आहे हे माझ्या नेत्यांना माहिती आहे. व माझ्या नेत्यांवर माझा विश्वास आहे. यावेळी किरण सामंत या केलेल्या एका वक्तव्याबाबत राणेंना पत्रकाराने प्रश्न विचारला असता त्यांनी मी उद्या रत्नागिरीत जाणार त्यावेळी त्यांना बोलायला सांगा असे उत्तर दिले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!