महाराष्ट्र गोवा कर्नाटक मधील आंतरराज्य  पोलीस अधिकाऱ्यांची बैठक संपन्न

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिन्ही राज्यातील बॉर्डरवर होणार कडक तपासणी 

दोडामार्ग (प्रतिनिधी) : महाराष्ट्र- गोवा- कर्नाटक या राज्यांची इन्टरस्टेट बॉर्डर पोलीस अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आज घेण्यात आली.सदर बैठक मध्ये आगामी लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली. बेकायदेशीर दारू, अमली पदार्थ, शस्त्रे, अवैध पैसे याची वाहतूक होणार नाही याबाबत उपायोजना,  तसेच पाहिजे व फरार आरोपी, नापत्ता व्यक्ती, गंभीर गुन्ह्यातील आरोपी व मालमत्ते संबंधी गुन्हे  आरोपी शोधण्याबाबत  चर्चा करण्यात आली.

सदर बैठक ही बेळगाव जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक एस. व्ही. बसर्गी त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. व बैलहोंगल चे पोलीस उपअधीक्षक  रवी डी. नायक, यांनी स्वागत केले.

सदर बैठकी करिता सिंधुदुर्ग जिल्हा सावंतवाडी  डीवायएसपी श्रीमती कविता गायकवाड, दोडामार्ग पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक  निसर्ग ओतारी, सावंतवाडी पोलीस ठाण्याचे एपीआय इंगवले, चंदगड पोलीस ठाण्याचे पीएसआय शेखर बारामती,बीचीलिम गोवा चे एसडीपीओ सागर एक्सोकर, वालपई गोवा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक श्री राहुल नाईक असे अधिकारी, खानापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री रामचंद्र नाईक व अंमलदार हजर होते.

error: Content is protected !!