श्रीकांत शिंदे कल्याण मतदारसंघातून निवडणूक मैदानात

मुंबई (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांना कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आता त्यांचा सामना ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांच्यासोबत होणार आहे. काही झाले तरी महायुती म्हणून आम्ही त्यांना निवडून आणू असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. भाजपा स्थापनाच्या दिना दिवशी आज फडणवीस यांच्याकडून त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यांच्या विजयासाठी शिवसेनेसोबत भाजपा राष्ट्रवादी सह सर्व महायुतीतील पक्ष एक दिलाने काम करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!