बांदा पोलिसांचा अवैध दारू वाहतुकीला चाप ; 1 लाख 32 हजारांच्या अवैध दारुसह 8 लाख 32 हजारांचा मुद्देमाल जप्त

बांदा (प्रतिनिधी) : गोवा बनावटीच्या बेकायदा दारू वाहतुकी विरोधात बांदा पोलिसांनी मध्यरात्री कोलगाव येथील विराज लक्ष्मीकांत वाडकर (२०, रा. कोलगाव काजरकोंड) व प्रशांत कोठावळे (रा. कोलगाव मारुती मंदिर जवळ) ताब्यात घेतले आहे.१ लाख ३२ हजार रुपयांची दारू व सुमारे ७ लाख टेम्पो असा एकूण ८ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल यावेळी जप्त केला आहे. सदर कारवाई इन्सुली चेकपोस्टवर मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. टेम्पोच्या हौद्यात दारू वाहतुकीसाठी स्पेशल चोरकप्पा तयार करून त्यातून दारू वाहतूक करीत होते. हि कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बडवे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधीर बर्डे, पोलीस हवालदार चंद्रशेखर मुणगेकर, रामचंद्र तेली, सिद्धार्थ माळकर, सीताकांत नाईक व पोलीस नाईक तुषार वाघाटे यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!