चंद्रहार पाटील ची उमेदवारी मागे घेण्यासाठी मतोश्रीकडून काँग्रेसकडे 100 कोटींची मागणी

आमदार नितेश राणे यांचा खळबळजनक गौप्यस्फोट

सिंधुदुर्ग (राजन चव्हाण ) : संजय राजाराम राऊत आज सांगली दौऱ्यावर आहे. उद्धव ठाकरे यांनी सांगलीत जाहीर केलेल्या चंद्रहार पाटील या उमेदवाराच्या प्रचारासाठी राऊत जात असल्याचे भासवत आहे. पण मातोश्रीकडून चंद्रहार पाटील ची उमेदवारी मागे घेण्यासाठी 100 कोटींची मागणी काँग्रेसकडे केल्याचे एका काँग्रेस नेत्याने फोन करून सांगितल्याचा गौप्यस्फोट भाजपा प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केला. हे खरे आहे की खोटे याचे उत्तर संजय राजाराम राऊत याने द्यावे असे आव्हानही आमदार नितेश राणे यांनी दिले. चंद्रहार पाटील यांना वाटत असेल की राऊत त्यांच्या प्रचारासाठी येत आहे पण काँग्रेसवर दबाव टाकून दबावनिती चा अवलंब ठाकरे सेना करत असल्याची टीकाही राणे यांनी केली.लोकसभा निवडणुक म्हणजे उद्धव ठाकरे साठी फक्त पैसे कमवायचा धंदा आहे.लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उमेदवारी विकायची आणि पैसे कमावणे हा उद्धव याचा धंदा आहे. जे वसुली करायचे त्यांनाच भाजपा ने सोबत घेतल्याची टीका करून उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट कबुली दिली आहे की ठाकरे सरकार हे वसुली सरकार होते. उद्धव ठाकरे यांच्या डोक्यावर परिणाम झाला असून त्यांना आग्र्या च्या मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवून उद्धव मुक्त महाराष्ट्र करा, असा टोला राऊत याना आमदार नितेश राणे यांनी लगावला.

error: Content is protected !!