ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत खारेपाटण विद्यालयाचे सुयश

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण या शाळेच्या प्राथमिक विभगात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच घेण्यात आलेल्या ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत घवघवित यश संपादन केले असून गुणवंत सर्व विद्यार्थ्यांचे खारेपाटण हायस्कूलचे वतीने मुख्याध्यापक संजय सानप यांच्या शुभहस्ते अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

खारेपाटण हायस्कूलच्या प्राथमिक शिक्षण विभगाच्या एकूण ४५ विद्यार्थ्यांनी या स्पर्धा परीक्षेत सहभाग घेतला होता.यामध्ये इयत्ता पहिली मधील आदित्य श्रीकृष्ण रानडे या विद्यार्थ्याने ९४ गुण तर जसप्रित खोसला ८२ गुण व कु.आलेशा इसफ या विद्यार्थिनीने ८१ गुण मिळवीत सिल्व्हर मेडल प्राप्त केले आहे. तसेच इयत्ता प्रमाणे गुणवंत ठरलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे

इयत्ता २ री – अन्वय देविदास कुमावत (८३ गुण ), मारिया पावसकर (७१ गुण) इयता- ३ री – सुखदा संतोष राऊत(९१ गुण), त्रिषा साळुंखे (७७ गुण), इयत्ता – ४ थी – अनुष्का जाधव (८२ गुण), दुर्वा हरर्यान(८० गुण), फातिमा ठाकूर(८१ गुण), सई लक्ष्मण काडगे (७९ गुण) तर इयत्ता – ६ वी मधून अभिनव हरर्यान (८१गुण) व इयत्ता ७ वी मधून अर्णव प्रवीण कासार (८७ गुण ) या विद्यार्थ्यांनी ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल खारेपाटण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लोकरे व सचिव महेश कोळसुलकर तसेच सर्व संचालक मंडळाने विशेष अभिनंदन केले आहे. तर या विद्यार्थ्यांना शाळेच्या शिक्षिका काझी मॅडम दर्पे मॅडम, गुरव मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

error: Content is protected !!