श्रीस्वामी समर्थ मठ, डामरे – कानडेवाडी, येथे 10 एप्रिल २४ रोजी प्रगट दिन सोहळा !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : गुरुवर्य श्री सावंतबाबा यांच्या आशीर्वादाने, प्रगट दिन सोहळा बुधवार दिनांक १० एप्रिल २४ रोजी संपन्न होत आहे. यानिमित्ताने सकाळी आठ वाजता श्रींचा मूर्ती अभिषेक, नऊ वाजता श्री स्वामीसुत विरचित प्रकटकांड वाचन महारुद्र हवन, दुपारी बारा वाजता श्रींची महानैवेद्य आरती, एक ते तीन महाप्रसाद ! सायंकाळी पाच ते सहा सामुदायिक नामस्मरण आणि श्री स्वामी समर्थ नित्यसेवा, सायंकाळी सहा तीस वाजता श्रींची नित्य सांज आरती व श्रींचा पालखी सोहळा, रात्री आठ ते नऊ महाप्रसाद,दहा वाजता अमर जवान क्रिएशन निर्मित, वस्त्रहरणकार गंगाराम गव्हाणकर लिखित, दोन अंकी तुफान विनोदी मालवणी नाटक,” कोर्टात खेचीन ” ! या सर्व सोहळ्याचा भाविकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, अशी विनंती स्वामी समर्थ मठ संयोजकांकडून करण्यात येत आहे.

error: Content is protected !!