विठ्ठल कंटाळे यांनी पळसंब सजा तलाठी म्हणून कार्यभार स्वीकारला….!

माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर यांच्यासह ग्रामस्थांनी दिल्या शुभेच्छा

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील पळंसब तलाठी सजा येथे तलाठी म्हणून विठ्ठल कंठाळे यांनी आज पदभार स्विकारला. त्यांना माजी सरपंच चंद्रकांत विजय गोलतकर, देवस्थान मानकरी राजन पुजारे, सुनिल मुणगेकर, सानिका सांवत, मंदिरी मुणगेकर , कोतवाल पोयरेकर, कृषिसेवक कुरकुटे ग्रामस्थांनच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. गेल्या महिनाभर येथे तलाठी उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत होती. तलाठी रुजू झाल्याने ग्रामस्थान मधून समाधानी व्यक्त केले जात आहे.

error: Content is protected !!