भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचे प्रतिपादन
वैभववाडी (प्रतिनिधी) : नारायण राणे यांनी गेली कित्येक वर्षे या वैभववाडी तालुक्यांमध्ये विकासाची गंगा आणली त्यांना प्रत्येकाने आपले मत देणे गरजेचे आहे. भाजपाचे बुथ अध्यक्ष, शक्ती प्रमुख, सरपंच, सोसायटी चेअरमन यांनी प्रत्येकाने आपला आपला भाग सांभाळा, पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाच्या माध्यमातून राज्यात राबविण्यात आलेले अनेक उपक्रम, आयुष्यमान भारत योजना, घरकुल योजना, उज्वला योजना व अन्य योजनांची माहिती आपण गावातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवा असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना केले. शिवाय संविधानास भाजपा धोका असल्याबाबत विरोधकांकडून बोलले जाते त्यात जराही तत्थ नाही हे लोकांना पटवून द्या. भाजपाला बाबासाहेब आंबेडकर यांचा अभिमान आहेच त्यांच्या स्मारकांचा विकास देखील भाजपाने केला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.











