युवा संदेश’च्या एसटीएस परीक्षेत चिंदर पालकरवाडी शाळेचे यश
आचरा (प्रतिनिधी) : युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च ( एसटीएस ) परीक्षेची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. या परीक्षेत जिल्हा परिषद शाळा चिंदर पालकरवाडी शाळेच्या इयत्ता 2 री मधील जय अमोल खेडकर 136 गुण सह तर 4 थी मधील यशश्री अमोल खेडकर हिने 138 गुण मिळवत सिल्व्हर मेडल प्राप्त केले आहे तसेच इयत्ता 2 री मधील भूमी अनंत आचरेकर ही विद्यार्थीनी उत्तीर्ण झाली आहे. शाळेतून 3 विद्यार्थी परीक्षेला बसले होते पैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होत निकाल 100% लागला आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांना केंद्र प्रमुख प्रसाद चिंदरकर, शिक्षक अमोल खेडकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. विद्यार्थ्यांचे शाळा, व्य. समिती, पालक, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.












