फोंडाघाट जि. प. मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी साधणार संवाद
फोंडाघाट (प्रतिनिधी) : केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांचा उद्या 11 एप्रिल रोजी फोंडाघाट मध्ये महायुती कार्यकर्ता संवाद मेळावा राधाकृष्ण मंगल कार्यालय फोंडाघाट येथे सकाळी 11 :30 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात आमदार नितेश राणे यांच्यासह शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित असणार आहेत. फोंडाघाट जिल्हा परिषद मदारसंघातील फोंडा, लोरे, घोणसरी, वाघेरी, नवीन कुर्ली पियाळी गावातील महायुती च्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. लोकसभा निवडणूक तोंडावर असून या निवडणुकीत अब की बार चार सौ पार ..पुन्हा एकदा मोदी सरकार हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी कंबर कसली आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून इंडिया आघाडीच्या विनायक राऊत याना पराभवाची धूळ चारून महायुती ची विजयी पताका फडकवण्यासाठी कार्यकर्त्याना मौलिक मार्गदर्शन केंद्रीयमंत्री राणे करणार आहेत. या मेळाव्याला महायुती च्या सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.












