शिवसेना उपतालुकाप्रमुख मंगेश गुरव यांची पत्रकार परिषदेत माहिती
खारेपाटण (प्रतिनिधी) : जिल्हा नियोजन वार्षिक योजना सन 2022-23 ग्रामपंचायत जनसुविधा कार्यक्रम अंतर्गत खारेपाटण शहरात सुमारे 30 लाखांचा तसेच तळेरे येथे 5लाखांचा निधी प्राप्त झाला आहे.या सर्व कामाची मागणी व पाठपुरावा हा खारेपाटण मध्ये नव्याने स्थापन झालेल्या तेव्हा असणाऱ्या बाळासाहेबांची शिवसेना व आत्ताच्या शिवसेना पक्षाच्यावतीने सातत्याने करण्यात आली .गेल्या अनेक वर्षात खारेपाटण मध्ये रस्त्याची तसेच विकासाची कोणतीही कामे सत्ताधारी नी केलेली नसल्याने तेव्हाची बाळासाहेबांची शिवसेना पक्ष व कार्यालय स्थापन झाल्यानंतर लगेचच लागलेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत खारेपाटण वासीयांनी थेट सरपंच सह तीन ग्रामपंचायत सदस्य निवडून देत आमच्यावर विश्वास दाखवला त्यामुळे निवडणुकीमध्ये दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करण्यासाठी सातत्याने वरिष्ठ महोदयांकडे विकासकामांची मागणी आम्ही करत होतो .असे मत शिवसेना उपतालुका प्रमुख मंगेश गुरव यांनी पत्रकार परिषद घेऊन तथा प्रसिध्दी पत्रकाद्वारे मांडले आहे.तसेच खारेपाटण ग्रामपंचायत निवडणुकीत मिळवलेल्या यशामुळे शिवसेना पक्षाचे नेते व रत्न सिंधू योजनेचे संचालक किरण उर्फ भैया सामंत, शिवसेना नेते व माजी खासदार सुधीर सावंत ,जिल्हा प्रमुख संजय आंग्रे यांच्या शिफारशी मुळे जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी खारेपाटणविभागासाठीसाठी भरघोस निधी मंजूर केला आहे.यामध्ये 1)श्री काल भैरव मंदिरा मार्गे बाजारपेठ जाणारा रस्ता
2)रामेश्वर नगर कॉलनी मधील सर्व अंतर्गत रस्ते
3)कोंडवाडी पाण्याची टाकी ते खांडेकर घराकडे जाणारा रस्ता
4) जैन वठार ते जैन मंदिरकडे जाणारा रस्ता
5)प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणारा रस्ता प्रस्तावित केला आहे.ही सर्व विकास कामे मंजूर होण्यासाठी शिवसेना खारेपाटण पक्षाच्या वतीने शिवसेना तालुका प्रमुख -शरद वायंगणकर,शिवसेना उपतालुका प्रमुख मंगेश गुरव, खारेपाटण सरपंच प्राची इसवलकर, यांनी मागणी व पाठपुरावा केला असून आमच्या प्रयत्नांना यश मिळाल्याचे समाधान व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रात शिवसेना व भाजपा महायुतीचे सरकार असून व पालकमंत्री हे जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष असल्याने पालकमंत्री या नात्याने मंजूर केलेल्या विकास कामाबद्दल आम्ही खारेपाटण शिवसेनेच्या वतीने त्यांचे आभार मानत आहोत.तसेच जिल्हा प्रमुख संजय आंग्रे ,शिवसेना नेते सुधीर सावंत ,आणि आमचे प्रेरणास्थान किरण सामंत याचे ही आभार प्रसिद्धीपत्रकाद्वारे शिवसेना उपतालुका प्रमुख मंगेश गुरव यांनी मानले आहेत.