देवेंद्र फडणवीस राणेंच्या प्रचाराला मैदानात

उद्या 26 एप्रिल रोजी राजापुरात जाहीर सभा

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुती चे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरणार असून उद्या 26 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजता राजापूर येथे राजीव गांधी मैदानात जाहीर प्रचार सभा घेणार आहेत. तळकोकणात प्रथमच कमळ निशाणीवर लोकसभा निवडणुक लढविली जात आहे. त्यातच खुद्द केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे महायुती चे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असल्यामुळे भाजपासह महायुतीच्या नेत्यांनी राणेंना पूर्ण ताकद दिली आहे. उद्या राजापूर येथे देवेंद्र फडणवीस यांच्या होत असलेल्या जाहीर प्रचार सभेनिमित्त उबाठा सेनेचे आमदार राजन साळवींच्या होम पिचवर राणे जोरदार शक्तिप्रदर्शन करतील.

error: Content is protected !!