शालेय स्पर्धा-परीक्षा मोफत मार्गदर्शन कार्यशाळा

आरोहण एज्युकेशन मुंबई चा उपक्रम – कणकवली येथे ३० एप्रिल रोजी आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : सदयस्थितीत शैक्षणिक बदलांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना ते शालेय शिक्षण घेत असताना स्पर्धा परीक्षांना सुद्धा प्रविष्ट व्हावे लागते. अभ्यासक्रमविषय व त्या विषयांना अनुसरून आवश्यक असणारे ज्ञान विद्यार्थी प्राप्त करू शकतात. प्रत्येक विद्यार्थ्याची आवड-निवड पण वेगळी असते. एखादयाला विज्ञान, गणित आवडेल तर इतर विविध वैयक्तिक आवडीच्या अभ्यासक्रमातील विषयाला अजून ज्ञानाची जोड ही विविध स्पर्धा परीक्षांमधून मिळते. विद्यार्थ्यांच्या या आवडीच्या विषयाला न्याय मिळावा, यादृष्टीकोनातून आरोहण एज्यूकेशन आपल्या सर्वांसाठी शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करीत आहे. यामध्ये इ. ५ वी / ६ वी च्या शिष्यवृत्ती परीक्षा, होमी भाभा परीक्षा – इ.६वी व इ. ९ वी., सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन च्या – इंग्लिश, गणित व सायन्स ऑलिम्पियाड परीक्षा, सैनिक व नवोदय स्पर्धा परीक्षा, हस्ताक्षर अभ्यासक्रम, सायकोमेट्रीक आणि अँटिट्यूड टेस्ट, आणि अबॅकस अभ्यासक्रम अशा विविध विषयांचा समावेश आहे.

या कार्यशाळेत गेली १० वर्षे या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञ तसेच आरोहण एजुकेशन मुंबई चे स्थापक आणि संचालक श्री. अमर आनंद आढाव (Masters in Science, MMM from Mumbai University) यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

या कार्यशाळेस जास्तीत जास्त पालक वर्गाने उपस्थित राहून आपल्या विदयार्थ्यांना योग्य दिशा मिळण्यासाठी, आणि विषयाच्या प्राविण्यतेसाठी आपण कार्यशाळेत सहभागी होऊन आपला सहभाग नोंदवावा. ही कार्यशाळा दि. 30 एप्रिल 2024 रोजी C /O एकलव्य अकॅडेमी , कांबळी गल्ली, भालचंद्र महाराज मठानजीक (तुनवाल इलेक्ट्रिक गाड्यांच्या शोरूम समोर) येथे संध्याकाळी ४. ०० वा. असणार आहे. अधिक माहितीसाठी प्रणाली सावंत (9820725989) मोबाईल नंबरवर संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!