गुटखा विक्रीच्या गुन्ह्यातील आरोपी आदिनाथ कराडे ला सशर्त जामीन मंजूर

ऍड.उमेश सावंत यांचा यशस्वी युक्तिवाद

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र प्रतिबंधीत असलेला सुमारे ४६ हजार रुपये किंमतीचा पानमसाला, गुटखा व तंबाखुजन्य पदार्थ आढळून आल्याप्रकरणी अटकेत असलेल्या कासार्डे दक्षिण गावठाण येथील आदिनाथ महावीर कराडे याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश एच. बी. गायकवाड यांनी ५० हजार रुपये किंमतीच्या जाचमुचलक्याचा सशर्थ जामिन मंजूर केला. संशयिताच्यावतीने ॲड .उमेश सावंत यांनी काम पाहिले.

१८ एप्रिल २०२४ रोजी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार कासार्डे दक्षिण गावठण येथील किरकोळ व्यावसायीक आदिनाथ कराडे याच्या घराशेजारी खोपीमध्ये केलेल्या छाप्याच्या कारवाईत सुमारे 46000 किमतीचा विमल, कैसरयुक्त पानमसाला व सुगंधी तंबाखु व इलायची अशी पाकिटे आढळून आली होती. याप्रकरणी हवालदार राजेंद्र जामसांडेकर यांनी फिर्याद दिल्यानुसार कणकवली पोलीस स्थानकात भादंवि कलम ३२८ सह अन्न सुरक्षा मानके कायदा कलम २६, २७, ३० व ५९ अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. आरोपीला एक दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर तो न्यायालयीन कोठडीत होता. त्याच्यावतीने जामिनासाठी दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी होत यापुढे गुटखा विक्री करणार नाही, असे हमीपत्र देण्याच्या अटींसह अन्य अटींवर जामिन मंजूर केला.

error: Content is protected !!