उत्कृष्ट वाड्मय निर्मितीसाठी आशीर्वाद पुरस्कारासाठी प्रस्तावाचे आवाहन

कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई येथील वंदना प्रकाशन संस्थेतर्फे उत्कृष्ट वाड्मय निर्मितीसाठी दरवर्षी आशीर्वाद पुरस्कार मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील सगळ्या साहित्य प्रकारांना सन्मान चिन्ह व मानपत्र या स्वरूपात दिले जातात. या पुरस्कारासाठी साहित्यिकांनी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.

1 जानेवारी 2011 ते 31 डिसेंबर 2023 या 13 वर्षात प्रकाशित झालेल्या पुस्तकांच्या निःशुल्क दोन प्रती इच्छुक सहभागी लेखक, लेखिका, कवी, कवयित्री, प्रकाशक, वितरक व संबंधितांनी स्वतःच्या अतिअल्प परिचयासह संस्थेच्या खालील पत्त्यावर 30 मे पर्यंत पाठवाव्यात. पुरस्काराच्या विचारार्थ पाठवलेली पुस्तके कोणत्याही सबबीवर परत केली जात नाहीत व निवड समितीचा पुरस्कारांचा निर्णय अंतिम असणार आहे.

यंदाचा आशीर्वाद पुरस्कार प्रदान सोहळा दिवाळी 2024 पूर्वी किंवा नंतर मुंबईत साजरा होणार आहे. त्यावेळी पुरस्कार विजेत्यांना स्वखर्चाने सदर सोहळ्यास उपस्थित राहावे लागेल याची संबंधितांनी नोंद घ्यावी. आपले प्रस्ताव डॉ. सुनील सावंत, ज्येष्ठ साहित्यिक व संस्थापक, आशीर्वाद पुरस्कार ’, फ्लॅट नं. 604, चंद्रदर्शन सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, आर. के. वैद्य मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई – 400 028 या पत्त्यावर पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी 9819182329 येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!