कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा मराठी अध्यापक संघ आणि दीपक केसरकर मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने २७ फेब्रुवारी रोजी सावंतवाडी प्रांत कार्यालयासमोरील काझी शहाबुद्दीन हॉल येथे मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाला राज्य मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष वि. ना. लांडगे, प्रमुख अतिथी म्हणून गोगटे वाळके महाविद्यालयाचे प्राचार्य गोविंद काजरेकर, माजी मुख्याध्यापक प्रदीप शिंदे, हस्ताक्षर महर्षी विकास गोवेकर आदी उपस्थित होते.
यावेळी मराठी अध्यापक संघाच्या आदर्श मराठी अध्यापक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. तसेच मार्च २०२२ च्या परीक्षेत मराठी विषयात ९७ टक्केपेक्षा अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. दोन वर्षात निवृत्त झालेल्या मराठी विषयाच्या शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला.
मराठी अध्यापक संघाच्यावतीने गेले २० दिवस एकूण १५ माध्यमिक व प्राथमिक शाळांमध्ये ‘मराठी भाषा विकास कौशल्य’ आणि परीक्षेला जाता जाता’ हा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये भरत गावडे, पांडुरंग सामंत, अनिल गोवेकर यांनी मार्गदर्शन केले. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणार माध्यमिक विद्यालय म्हणून ओळखले जाणारे शिवडाव माध्यमिक विद्यालय शिवडाव.! च्या मराठी विषयाच्या शिक्षिका सौ. रिया रामनाथ गोसावी यांना आदर्श मराठी विषय शिक्षक पुरस्काराने राज्य मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष वि. ना. लांडगे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
विशेष म्हणजे रिया गोसावी ह्या शिवडाव माध्यमिक विद्यालयात मराठी विषय शिक्षिका आहेत. अत्यंत मराठी विषयाचा सूक्ष्म अभ्यास त्यांना ज्ञात आहे. त्यामुळे दहावीच त्या मार्गदर्शनात केवळ शालेय मर्यादित राहिल्या नाही तर त्यांचे विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांना त्यांचे मोलाचे मार्गदर्शन असते. विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मराठी विषय कशा पद्धतीने अधिक सोप्पा होईल याबाबत त्यांचे वारंवार मार्गदर्शन, मराठी विशेष क्लास घेत असतात. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराने शिवडाव माध्यमिक विद्यालय शिवडाव च्या यशात अजून भर पडली आहे.