तिथवली गावातील हरयाण नामक चौघा आरोपींवर गुन्हा दाखल
वैभववाडी (प्रतिनिधी) : ऑन ड्युटी असताना जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याची फिर्याद वैभववाडी पोलीस ठाणेचे पोलीस हवालदार यांनी वैभववाडी पोलीस ठाणेत दिली आहे. या प्रकारणी तिथवली येथील आरोपी संतोष रामचंद्र हरयाण, आत्माराम रामचंद्र हरयाण, प्रकाश हरयाण, दिलीप हरयाण या चौघांवर ॲट्रॉसिटी ॲक्ट व सरकारी कामात अडथळा केले प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास नानीवडे फाट्याजवळ घडली. चौघाण पैकी तीन आरोपींना अटक करून त्यांना जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले आहे. तर एक आरोपी अदयाप फरार आहे.
सोमवारी सायंकाळी आरोपी संतोष हरियाण यांनी 112 नंबर कंट्रोल रूमला फोन करून गावात दारू विक्री सुरु असल्याची तक्रार पोलीसांना दिली. याची दाखल घेऊन वैभववाडी पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल यांनी भुईबववाडा बिट अंमलदार व पोलीस कॉन्स्टेबल श्री कोलते या दोघांना पोलीस गाडी घेऊन तिथवलीला पाठवले. पोलस गाडी नानीवडे फाट्याजवळ गेल्यावर त्याठिकाणी थांबवली. त्या ठिकाणी आरोपी संतोष हरयाण व इतर आरोपी होते. आरोपी संतोष हरयाण यांनी एकेरी भाषेत तू कशाला आलास. असे म्हणतं जाती वाचक शिवीगाळ करत त्यांना चौघानी मारहाण केली. पोलीस कोलते यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र ते चौघेजण असल्यामुळे त्यांनी फिर्यादीला यांना जबर मारहाण केली.
तिथवली देवस्थान श्री गांगेश्वर मंदिरातील मनापाणावरून दोन गटात वाद आहे. याचा तपास बिट अंमलदार यांच्याकडे होता. याप्रकारणी हरयाण याला नोटीस देण्यात आली होती. त्याचा राग मनात ठेऊन फिर्यादी हवालदार यांना जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी गंभीर दाखल घेत आरोपीना अटक करून ॲट्रॉसिटी ॲक्ट व सरकारी कामात अडथळा केले प्रकरणे पुन्हा दाखल केला आहे मंगळवारी दुपारी त्यांना जिल्हा सत्र न्यायालयात सादर करण्यात आले आहे