कणकवली बाजारपेठ मधील जिनिषा सांबरेकर हिचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली बाजारपेठेतील रहिवासी जिनिषा भाई उर्फ रविंद्र सांबरेकर (३२) हीचे कोल्हापूर (हातकणंगले) येथील राहत्या खोलीमध्ये सोमवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले! तिच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. जीनिषा हिचे आयटीचे शिक्षण पूर्ण करून ती सध्या हातकणंगले येथे एका कंपनीत नोकरीस होती. आपल्या मैत्रिणींसोबत तेथे राहत होती. सायंकाळी कामावरून आल्यानंतर ती आपल्या रूममध्ये एकटी झोपली होती. त्यानंतर काही वेळाने मैत्रिणी ही रूमवर आल्या मात्र दरवाजा उघडत नसल्याने व फोन ही उचलत नसल्याने दरवाजा तोडून पाहिले असता ती बेडवर झोपलेल्या अवस्थेत होती. तिला उठवले असता ती उठत नसल्याने तिला नजीकच्या रुग्णालयात हलविण्यात आले यावेळी डॉक्टर यांनी तिला मृत घोषित केले.

जिनिषा मनमिळावू स्वभावाची आपल्या भावंडांना व सहकाऱ्यांना शैक्षणीक शेत्रात प्रोत्साहन देणारी होती. ती चांगली बास्केट बॉल खेळाडू होती. तिच्या पश्चात आई,भाऊ, बहिण काका, काकी असा परिवार आहे. मराठा समाजाचे सक्रिय कार्यकर्ते महेंद्र सांबरेकर व माजी नगरसेविका माया सांबरेकर यांची ती पुतणी होय. तिच्यावर कणकवली स्मशानभूमीत आज ९.३० वा. अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!