वैभववाडी (प्रतिनिधी) : लघुउद्योगाची महिती जाणून घेत आर्थिक सबलीकरणाकडे वाटचाल करण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायत लोरे नं 2 गावातील बचत गटातील 40 महिला लघुउद्योग अभ्यास दौऱ्यासाठी आज रवाना झाल्या. सरपंच विलास नावळे, उपसरपंच पाचकूडे, ग्रा पं सदस्य रितेश सुतार , ग्रामसेवक एस बी काळे यांनी या अभ्यास दौऱ्याला शुभेच्छा दिल्या. 14 वा वित्त आयोगांतर्गत महिला आर्थिक सबलीकरण उद्देशाने या अभ्यास दौऱ्याचे आयोजन लोरे नं 2 ग्रामपंचायत च्या वतीने करण्यात आले आहे. सावंतवाडी वेंगुर्ले कुडाळ तालुक्यातील यशस्वी लघुउद्योजकांना भेट देत त्यांच्या उद्योग आणि मार्केटिंग बाबत ची माहिती या अभ्यास दौऱ्यात घेण्यात येणार आहे. वेंगुर्ले येथील काथ्या उद्योग, वेंगुर्ले फळसंशोधन केंद्र, तसेच अन्य उद्योगांना यावेळी भेट देण्यात येणार आहे.