अष्टपैलू कलानिकेतन मालवण आयोजित

सवेश साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धेत

खारेपाटण हायस्कूलची विद्यार्थिनी कु.प्राजक्ता ठाकूरदेसाई हिने मिळविला प्रथम क्रमांक

खारेपाटण (प्रतिनिधी) : कलाक्षेत्रातील नावाजलेली एक संस्था म्हणून जीची संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक वेगळी ओळख असणाऱ्या अष्टपैलू कलानिकेतन मालवण या संस्थेच्या वतीने नटवर्य कै. राम गणेश गडकरी स्मृती प्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या सवेश साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धेत खारेपाटण येथील शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण या हायस्कूलची विद्यार्थिनी कु.प्राजक्ता अभय ठाकूरदेसाई हिने प्रथम क्रमांक मिळविला आहे.तिच्या या संगीत कला शेत्रातील यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

कु.प्राजक्ता ठाकूरदेसाई हिने यापूर्वीही अनेक जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय संगीत गितगायन स्पर्धेत सहभाग घेतलेला असून विविध स्पर्धांमध्ये तिने यश संपादन केले आहे.खारेपाटण हायस्कूलची विद्यार्थिनी असलेल्या कु. प्राजक्ता ठाकूरदेसाई हिला खारेपाटण हायस्कूलचे संगीत शिक्षक संदीप पेंडूरकर यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले आहे.

अष्टपैलू कलानिकेतन मालवण या संस्थेने आयोजित केलेल्या या सवेश साभिनय गीत गायन स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. तब्बल सहा तास चाललेल्या या गायन स्पर्धेत कु.प्राजक्ता हिच्या गायनाने परीक्षक व रसिक मंत्रमुग्ध झालेत. उत्तररात्री या स्पर्धेचा निकाल घोषित करण्यात आला. यामध्ये कू.प्राजक्ता ठाकूरदेसाई हिने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला.

कु.प्राजक्ता ठाकूरदेसाई हिच्या या यशा बद्दल तिचे व तिच्या आई वडिलांचे खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, सेक्रेटरी महेश कोळसुलकर,सर्व संचालक मंडळ, खारेपाटण हायस्कूलचे मुख्याद्यापक संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यानी विशेष अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!