आचरा (प्रतिनिधी) : श्री ब्राम्हणदेव सेवा मंडळ चिंदर सडेवाडी आयोजित भव्य खुली ऐकेरी नृत्य स्पर्धा, चिंदर सडेवाडी ब्राह्मणदेव रंगमंच्यावर नुकतीच पार पडली. या स्पर्धेत घन:शाम सोनावणे व महेश मेस्त्री यांनी प्रथम, नेहा जाधव आणि पूर्वा मेस्त्री यांनी द्वितीय तर स्वरांगी खानोलकर व ईशा गोडकर यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. समर्थ गवंडी व रॉनी जाधव यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर मंडळाचे अध्यक्ष पंढरीनाथ उर्फ भाऊ हडकर, चिंदर उपसरपंच दिपक सुर्वे, प्रकाश मेस्त्री, संतोष मेस्त्री, दत्ता वराडकर, मनोज हडकर, अनिल वराडकर, किरण वराडकर, लवू हडकर, विश्राम मुंबरकर, सहदेव हडकर आदी मंडळाचे कार्यकर्ते, प्रेक्षक ग्रामस्थ उपस्थित होते.
स्पर्धेचे नियोजन विजय उर्फ बाबू कदम यांनी केले. तसेच तेजस्विता केळुस्कर, रोहन वराडकर, मिथुन चिंदरकर यांनी सहाय्य तर राजा सामंत यांनी सूत्रसंचालन व प्रियांका सकपाळ, प्रियांका करंबळेकर यांनी स्पेर्धेचे परीक्षण केले.












