आरोग्य मार्गदर्शन, तपासणी शिबिर, विविध गुणदर्शन, साहित्यिक व्याख्यान इ.कार्यक्रमांची रेलचेल!
फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट बौध्द विकास मंडळ, मुंबई व गावशाखा तसेच भारतीय बौद्ध महासभा शाखा फोंडाघाट यांच्या संयुक्त विद्यमाने, फोंडाघाट येथील नालंदा बुद्ध विहारात दि.२२ व २३ मे २०२४ रोजी भ. बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुकत जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि.२२ मे रोजी सकाळी १०. ते ११:३० वाजता कणकवली येथील प्रसिद्ध स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ डॉ. शामिता बिरमोळे (एम. डि.)यांचे स्रियांचे आजार व त्याबाबत घ्यावयाची काळजी यावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. ११:३० ते १३:०० या कालावधीत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून फोंडाघाट प्रा. आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. यादव (एम. बि. बि. एस.) व त्यांचे सहकारी रुग्णांची आरोग्य तपासणी व औषधोपचार करणार आहेत.
संध्याकाळी १८:०० ते २०:३० या कालावधीत स्रियांचे व मुलांचे विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि.२३ मे रोजी सकाळी ९ ते ९:३० ध्वजारोहण, ९:३० ते १०:३० धम्मपूजापाठ, १०:३० ते १२:३० कालावधीत पत्रकार, साहित्यिक अजय कांडर व कवयित्री प्रा. प्रमिता तांबे, कणकवली यांचे भ. बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. रात्री ९:३० नंतर सांस्कृतिक कार्यक्रम, मान्यवरांचे मार्गदर्शक व बक्षीस वितरण समारंभ आयोजित केला आहे.
वरील दोन दिवसीय कार्यक्रमांस आंबेडकर वैचारिक प्रेमीनी उपस्थिती दर्शवावी असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष व सचिव यांनी केले आहे.