ओरोस (प्रतिनिधी) : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षा फेब्रुवारी 2024 मध्ये न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कसाल प्रशालेने अभिनंदनीय यश संपादन केले आहे. २०४ विद्यार्थ्यांपैकी २०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ९९.०१ टक्के निकाल लागला आहे.
विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के लागला असून समृद्धी गावडे (83.17 टक्के), प्रतिक परब (78.33 टक्के), प्रसाद पालव (77.83 टक्के) गुण मिळवत प्रथम तीन क्रमांक मिळविले आहेत. वाणिज्य शाखेचा 98.27 टक्के निकाल लागला आहे. या विभागात प्रथम योगीता पांचाळ (84.83 टक्के), द्वितीय पूनम परब (80 टक्के) तृतीय श्रेयश कांबळे (76.83 टक्के) यांनी यश मिळविले आहे. तसेच कला शाखा विभागाचा 97.82 टक्के निकाल लागला आहे. यामध्ये सोनल मेस्त्री (61.17 टक्के), कविता बावकर (60.17 टक्के), युवराज कसालकर (58.33 टक्के) यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक प्राप्त केले आहेत.
गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष आनंद सावंत, सचिव यशवंत परब, प्रभाकर सावंत व विश्वस्त तसेच शाळा समिती अध्यक्ष नवीन बांदेकर, अवधूत मालणकर, मुख्याध्यापक उत्तम मळगांवकर व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.












