ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गनगरी येथील डॉन बोस्को हायस्कूल व जुनिअर कॉलेजचा उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा २०२४ चा वाणिज्य व शास्त्र या दोन्हीही शाखेचा निकाल सालाबादप्रमाणे १०० टक्के लागला आहे. या प्रशालेने गेली १० वर्षे सतत १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.
शास्त्र शाखा विभागातून एकूण विद्यार्थी ३१ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. यामध्ये गुणानुक्रमे प्राजक्ता मुकुंद जाधव (८३.३३ टक्के), द्रीष्टी राजेश चव्हाण (८०.६७ टक्के), भूमी संदीप देऊलकर (७७.१७ टक्के) यांनी प्रथम तीन क्रमांक मिळविले आहेत. तर वाणिज्य शाखा विभागातून एकूण २४ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. यामध्ये प्रथम तन्वी केदार म्हाडगुत (९७ टक्के), द्वितीय आराध्य मंदार भिसे (९५ टक्के), तृतीय अमेय गजेंद्र राणे (९३.८३ टक्के) गुण मिळविले आहेत.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचेप्रशालेचे मुख्याध्यापक फादर सविओ गोम्स, उप मुख्याध्यापक फादर मेल्विन फेराव, संस्थेचे मॅनेजर फादर पॉल डिसोझा तसेच फादर फ्रान्सीस झेविएर यांनी अभिनंदन केले आहे.












