पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशाने लोकप्रतिनिधी उतरले शेतात
जिल्हापरिषद सदस्य सुप्रिया मेस्त्री, पंचायत समिती सदस्य गुरुनाथ वर्देकर यांच्या समवेत ग्रामपंचायत सदस्य यांनी केली भात शेती पाहणी
कणकवली (प्रतिनिधी) : दुष्काळजन्य परिस्थितीने कोकणात भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत झाले असून पावसाने पूर्ण पाठ फिरवल्याने शेतकरी बांधव हवालदिल झाले आहेत. पालकमंत्री नितेश राणे यांनी नुकत्याच घेतलेल्याआढावा बैठकीत सर्वं लोकप्रतिनिधीनी शेती पाहणी करून अधिकाऱ्यांच्या संपर्कात रहावे, दुष्काळ विचार करून गावोगावी श्रमदानातून कच्च बंधारे बांधन्याच्या सूचना दिल्या असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मदत मिळवून देण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे पाठपुरावा करत आहेत. आपल्या सर्वांच्या पाठीशी सरकार आहे असे जिल्हापरिषद सदस्या सुप्रिया मेस्त्री यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना म्हणाले. यावेळी उपसरपंच रवींद्र यादव, माजी उपसरपंच दिनेश गोठणकर, सदस्य अनुप वारंग, नितीन पवार, स्वाती नारकर, सचिन खोचरे, श्रेयस चिंदरकर, जयराम चिंदरकर, बाबू नारकर समीक्षा नांदगावकर, संतोष पाटकर, प्रणय शिर्के, रुपेश नाडकर्णी उपस्थित होते.












