खारेपाटण बस स्थानकात एस टी महामंडळाचा ७६ वा वर्धापन दीन साजरा

खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळ राज्यातील प्रवाशांच्या सोयी साठी सुरू झाल्यापासून ७५ वर्ष पूर्ण झाली असून एस टी महामंडळाचा आज ७६ वा वर्धापन संपूर्ण राज्यात साजरा करण्यात येत असून कणकवली तालुक्यातील खारेपाटण येथील एस टी बस स्थानकात देखील एस टी. महामंडळाचा ७६ वा वर्धापन दीन उस्ताहात साजरा करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळाच्या ७६ व्या वर्धापन दीना निमित्त खारेपाटण एस टी बस स्थानकात आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती.तसेच बस स्थानक परिसरात रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.या वर्धापन दीन कार्यक्रम निमित्त म.रा.मार्ग परिवहन मंडळाच्या सिंधुदुर्ग विभागाच्या लेखा अधिकारी दळवी मॅडम तसेच खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारसंतोष पाटणकर यांनी खारेपाटण एस टी बस स्थानकास सदिच्छा भेट दिली.व शुभेच्छा दिल्या. यावेळी खारेपाटण एस टी बस स्थानक नियंत्रण प्रमुख मनोहर चव्हाण यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच महाराष्ट्र राज्य एस टी परिवहन महामंडळ यांचे वर्धापन दीन कार्यक्रमाच्या निमित्ताने खारेपाटण एस टी बसस्थानक नियंत्रण प्रमुख मनोहर चव्हाण यांनी बस स्थानकातील प्रवासी बांधवांना व एस टी बस च्या वाहक – चालक याना पेढे वाटून आनंद व्यक्त केला.

error: Content is protected !!