वालावल माऊली मंदिरात अध्यात्मिक कार्यक्रम

कुडाळ (प्रतिनिधी) : वालावल येथील श्री. देवी माऊली मंदिरात शृक्रवार ३ व शनिवार ४ मार्च रोजी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार दिनांक ३ मार्च रोजी सकाळी ८ वा. शरीर शुध्दी, ग्रामदेवता बहुमान समर्पण, गणपती पूजन, पुण्याहवाचन, नांदी श्राध्द, मात्रुका पूजन, ऋत्विक वरण, देवता आवाहन, स्थापन, चंदिपाठ वाचन आणि नवग्रह हवन,श्री. देवी माऊली माते चरणी कुंकुमार्जन.दुपारी २ वा. नैवेद्य व महाआरती,दुपारी ३ वा. स्वरांजली ग्रुप वालावल यांचा भावगीत आणि भक्तीगीत अभंग.

शनिवार दिनांक ४ मार्च रोजी सकाळी ४ वा. नित्य नैमित्तिक पूजा, चांदिपाठ हवन,सकाळी १०:३० वा. बलिदान पूर्णाहुती,,दुपारी १२ वा. नैवेद्य व आरती, गाऱ्हाणे व महाप्रसाद सायंकाळी ४ वा. स्थानिकांची भजने,रात्रौ. १०:३० वालावलकर दशावतार नाट्य मंडळ, वालावल यांचा या ठिकाणी दणदणीत नाट्य प्रयोग सादर होणार आहे. तरी या दोन दिवसाच्या कार्यक्रमाला सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे. असे , आवाहन श्री. लक्ष्मीनारायण स्थानिक सल्लागार उपसमिती वालावल यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!