खारेपाटण (प्रतिनिधी) : “सोशल वर्कर्स असोसिएशन फॉर मेडिकल, एज्युकेशन अँण्ड एन्वायर्नमेंट, परळ, मुंबई ” या सामाजिक संस्थेतर्फे गेली अनेक वर्षे सातत्याने विविध विधायक उपक्रम राबवले जातात. सालाबादप्रमाणे याही वर्षी अल्प उत्पन्न असलेल्या पालकांच्या पाल्यांसाठी नुकतेच शालेपयोगी साहित्य वस्तूंचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रमाणे “स्वामी” संस्थेने कामगार विभागातील अल्प उत्पन्न असलेल्या पालकांच्या मुलांसाठी नियोजनबध्द शैक्षणिक साहित्य वाटप करन्याठी विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेण्यात आले होते. त्यानुसार रविवार दि.०९/०६/२०२४ रोजी शाळा सुरू होण्यापूर्वी तीनशे वीस विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रत्येक विद्यार्थ्यांना एक डझन वह्या, पॅड, पेनसेट, रबर, पेन्सिल,पट्टी असे शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी पुढील इयत्तेत शाळेत जाणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद अवर्णनीय होता. डोळ्यात अभ्यासाचे स्वप्न घेवून हे विद्यार्थी उद्या मोठे होवून तेही पुढे गरजूंना अशीच मदत करतील,हेच संस्कार आपण रुजवतोय,याचा आनंद सोशल वर्कर्स असोसिएशन फॉर मेडिकल एज्युकेशन अँड एन्वायर्नमेंट, परळ, मुंबई ” या संस्थेला झाला असल्याची प्रतिक्रिया यावेळी संस्थेच्या पदाधिकारी यांनी बोलून दाखवली. समाजात असे नवीन सार्थ पायंडे पाडून आपल्या मुलांना लहान वयात समाजसेवेचे व्रत प्रसवणारे “स्वामी” संस्थेचे सर्व निस्वार्थी कार्यकर्ते यांच्या विषयी समाजातून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. आपणही यांचे आदर्श घेवून इतर अनेक विभागात असेच उपक्रम राबवावेत, असाच शैक्षणिक सोहळा साजरा करण्याचा प्रयत्न करावां असे आवाहन विद्यार्थी व समाजातील नागरिकांना करण्यात आले.