खारेपाटण येथील भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतली खासदार नारायण राणे यांची सदिच्छा भेट

पुष्पगुच्छ देत केले अभिनंदन व दिल्या शुभेछा….

खारेपाटण (प्रतिनिधी) : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदार संघात भरघोस मतांनी विजयी झालेले भारतीय जनता पार्टीचे उमेदवार तथा नवनिर्वाचित खासदार व माजी केंद्रीय मंत्री नामदार नारायण राणे यांची नुकतीच खारेपाटण विभागातील भाजप कार्यकर्ते यांनी सदिच्छा भेट घेत अभिनंदन केले.व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

खासदार राणे हे नुकतेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले होते.यावेळी त्यांच्या कणकवली येथील ओम गणेश बंगल्यावर खारेपाटण येथील पदाधिकारी यांनी भेट घेतली.यावेळी खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघाचे माजी सदस्य तथा माजी जि.प.बांधकाम वित्त सभापती रविंद्र उर्फ बाळा जठार यांचे हस्ते खासदार नारायण राणे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन करण्यात आले.
यावेळी कुरंगवणे – बेर्ले सरपंच श्री पप्पू ब्रम्हदंडे,उपसरपंच श्री बबलू पवार, चिंचवली सरपंच श्री अशोक पाटील, तळेरे उपसरपंच श्री शैलेश सुर्वे,खारेपाटण बूथ अध्यक्ष शेखर कांबळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!