फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट बाजारपेठेतील पारंपरिक वारसा लाभलेले जुने-सुपरिचित हनुमान हॉटेलचे मालक अशोक तथा बाळा विष्णू भोगले (७२ वर्षे ) यांचे कणकवली येथील खाजगी रुग्णालयात सोमवारी रात्री दहा वाजता हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने आकस्मिक दुःखद निधन झाले. मनमिळावू -ग्राहकाभिमुख आणि मिश्किल स्वभावामुळे त्यांचा लोकसंग्रह मोठा होता. वाड -वडिलांनी कित्येक वर्षांपूर्वी सुरू केलेले हनुमान हॉटेल, त्यांनी आपल्या दुसऱ्या पिढीमध्ये आजच्या स्पर्धा युगात जिद्दीने चालविले होते.त्यांच्या पुढील पिढीतील त्यांचे सुपुत्र सचिन व्यवसाय लिलया सांभाळीत आहेत.
ग्रामपंचायत सदस्य पवन यांचे ते आजोबा तर प्रीतम यांचे ते काका होत. त्यांचे पश्चात एक मुलगा, एक मुलगी, भाऊ-बहिणी असा मोठा परिवार आहे. मंगळवारी दुपारी उशिरा झरयेवाडी येथील वैकुंठभूमीत, त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सर्वस्तरातील मित्रपरिवार, नातेवाईक,व्यावसायिक,ग्राहक आणि विविध पक्षीय स्थानिक नेते- कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.