पडेल जिल्हा परिषद येथे जेष्ठ शिवसैनिकांचा कृतज्ञता पुरस्काराचा पाचवा सत्कार सोहळा संपन्न

सामाजिक भाव जपण्यासाठी जेष्टांचा सन्मान – युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक

देवगड (प्रतिनिधी) : युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या माध्यमातून युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हा परिषद गटनुसार जेष्ठ शिवसैनिकांचा कृतज्ञता पुरस्कार -सन्मान पंढरवडा कार्यक्रम ठीक ठिकाणी संपन्न होत आहेत. पडेल जिल्हा परिषद येथे वाडा गावामध्ये जेष्ठ शिवसैनिकांचा कृतज्ञता पुरस्काराचा पाचवा कार्यक्रम संपन्न झाला. सामाजिक भाव जपण्यासाठी युवासेनेच्या माध्यमातून या कार्यकमाचे आयोजन करण्यात आले आहे. कोकणातील शिवसैनिकांनी त्यावेळी बाळासाहेबांना साथ देऊन कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला केला त्याचे कृतज्ञता म्हणून आम्ही त्या जेष्ठ शिवसैनिकांचा सत्कार करत आहोत. उद्धव साहेबांना व आदित्य साहेबांना त्या जेष्ठ शिवसैकांचे आशीर्वाद मिळण्यासाठी हार्दिक कार्यक्रम करण्यात आला. त्यावेळी जशा प्रकारे शिवसेना भक्कम केली तशा प्रकारे आता युवासेनेची जबाबदारी आहे. युवासेनेच्या माध्यमातून प्रत्येक जिल्हा परिषद गटात या कार्यक्रमांचे आयोजन युवासेने मार्फत करण्यात येणार आहे.अशेच चांगल्या प्रकारचे उपक्रम युवासेने मार्फत नेहमी करण्यात येते. यावेळी महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता येणार असा ठाम विश्वास युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी पडेल येथील मेळाव्यात व्यक्त केला.

यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, देवगड युवासेना तालुकाप्रमुख गणेश गांवकर, उपजिल्हाप्रमुख उदू ठाकूर देसाई, वाडा सरपंच सुनील जाधव, विभाग प्रमुख रामा राणे, शशांक तावडे, सुहास वाडेकर , संजय तावडे, चंद्रकांत तानवडे, बाबू तानवाडे, अजिंक्य तानवाडे, राजा परब आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!