बारावीच्या सहकार आणि जीवशास्त्र पेपर चे केंद्र कसाल हायस्कुल ऐवजी डॉन बॉस्को स्कुल ला

ओरोस (प्रतिनिधी) : कोकण विभागीय बोर्डाच्या सूचनांनुसार कसाल न्यू इंग्लिश स्कूलच्या कसाल येथील बारावी बोर्ड परीक्षाच्या दोन पेपरसाठी केंद्राच्या स्थानकात बदल करण्यात आला आहे.

6 मार्च 2023 व 8 मार्च 2023 रोजी दहावी व बारावी दोन्ही वर्गांची एकाचवेळी परीक्षा असल्याने बैठक व्यवस्थे बाबत होणाऱ्या गैरसोयीचा विचार करून कोकण विभागीय बोर्डाने डाॅन बाॅस्को प्रशाळा,ओरोस येथे तातपुरते बारावी परीक्षा उपकेंद्र मंजूर केले आहे. सदर केंद्रावर बारावीच्या परीक्षार्थांची परीक्षा होणार आहे. 6 मार्च 2023 रोजी सकाळी 11ते 2.10 या वेळेत सहकार (53) विषय W014586 ते W014634, W023902 ते W024034

तसेच 8 मार्च 2023 रोजी सकाळी 11 ते 2.10 या वेळेत जीवशास्त्र (56) विषय W007487 ते W007638 या परीक्षार्थांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.याची परीक्षार्थांनी नोंद घ्यावी असे आवाहन केंद्र प्रमुख गुरुदास कुसगांवकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!