वैभववाडी (प्रतिनिधी) : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली संलग्न उद्यानविद्या महाविद्यालय येथील चतुर्थ सत्रातील कृषी दूतांनी तिथवली येथे माती परीक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेला शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन सहभाग दर्शविला. कृषिदूतांनी यावेळी विविध विषयावरची प्रात्यक्षिके सादर केली. शेती अध्यायात महत्वाचा विषय म्हणजे माती परीक्षण असते.
याबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृत व्हावी याकरिता सांगुळवाडी येथील विद्यार्थ्यांनी मातीपरीक्षण कार्यशाळा तिथवली येथे घेतली. माती परिक्षणाचे महत्व गावातील शेतकऱ्यांना पटवून दिले. यावेळी हिरवळीच्या सेंद्रिय खतांचे फायदे, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे फायदे व त्यामुळे उत्पादनात होणारी वाढ, पिकावरील कीड व रोग नियंत्रण, खतांचा वापर या विषयांवर माहिती देण्यात आली. तसेच त्याची प्रात्यक्षिके विद्यार्थीनींनी सादर केली. यावेळी तिथवली गावचे शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यशाळेचे आयोजन वैभव बंडगर सुशांत तायडे शुभम राऊत कौशल पाताडे ओवेश संसारे ऋषिकेश भोंग सिद्धेश वारीक अनिकेत मारकड या कृषी दूतांनी केले होते. या कार्यक्रमाकरिता गावातील ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते. तसेच हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरीता उद्यानविद्या महाविद्यालय सांगुळवाडी प्रा. ए.आर. कामतेकर, कार्यक्रम समन्वयक प्रा. पी. एस. सावंत, प्रा. कणसे यांचे मार्गदर्शन व सहकार्य विद्यार्थ्यांना लाभले.