उत्तम पवार स्मृती शिष्यवृत्तीसाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन !

दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग या संस्थेच्या वतीने आयोजन

मसुरे (प्रतिनिधी) : दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग या संस्थेच्या वतीने संस्थेचे संस्थापक कालकथित उत्तम पवार यांच्या ८ व्या स्मृतिदिनानिमित्त उत्तम पवार स्मृती-ज्ञानव्रती विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी आवाहन करण्यात येत आहे. विद्यार्थ्याच्या शैक्षणिक वाटचालीला प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळावे यासाठी दरवर्षी सदर शिष्यवृत्ती देऊन दहावी आणि बारावीतील प्रत्येकी एका विद्यार्थ्याला दरमहा १००० ₹ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. सन २०२३/२०२४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या होतकरू विद्यार्थ्यांसाठी उत्तम पवार स्मृती- ज्ञानव्रती विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी माहिती मागवत आहोत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या प्रत्येकी एका विद्यार्थ्याचा विचार करून निवड केली जाईल. सदर विद्यार्थी निवडताना दहावीत किमान ८०% आणि बारावीत किमान ६०% गुण प्राप्त झालेले असावेत. प्रस्ताव करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी कृपया आपल्या गुणपत्रकाची झेरॉक्स प्रत आणि फोटो संस्थेकडे पाठवावा. (प्रस्ताव नमुना अर्जासहित)

निवड झालेल्या दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्याला दरमहा १०००/- रु शिष्यवृत्ती दिली जाईल. सदर शिष्यवृत्ती दरवर्षी नव्याने विद्यार्थी निवड करून दिली जाईल. सदर शिष्यवृत्तीसाठी स्वतंत्र निवड समिती स्थापन करण्यात येईल ,निवड समितीने दिलेला निर्णय अंतिम राहिल.

पात्र विद्यार्थ्यांचे कौटुंबिक सर्वेक्षण करुन संस्थेला निवड प्रक्रियेसाठी सहकार्य करावे तसेच पात्र विद्यार्थ्यांची कौटुंबिक माहितीसह यादी दिनांक १० जुलै पर्यंत संस्थेकडे पाठवून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क
आनंद तांबे- 9689144628, प्रा.सिद्धार्थ तांबे- 9158463296, संतोष तांबे- 7744978742, विशाल हडकर- 9049813916,
सुभाष कदम- 9226301373.

(सोबत पात्र विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती प्रस्ताव अर्ज पाठवत आहोत. सदर अर्जात सविस्तर माहिती भरुन संस्थेकडे पाठवावी)
खाली दिलेल्या लिंक मध्ये माहिती भरावी
https://forms.gle/ansZGTdK9tpwZYuW9

error: Content is protected !!