कोकण पदवीधर निवडणुकीसाठी सिंधुदुर्गात 81.1 टक्के मतदान

महायुतीचे निरंजन डावखरे, महाविकास आघाडीचे रमेश किर यांच्यात लढत ; 1 जुलै राेजी मतमाेजणी

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : कोकण विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८०.१ टक्के मतदान झाले आहे. एकूण १८.५५१ मतदारांपैकी १४,८५८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. या निवडणुकीत १३ उमेदवार असले तरी खरी लढत महायुतीचे उमेदवार आमदार निरंजन डावखरे विरुध्द महाविकास आघाडीचे रमेश किर यांच्यात होत आहे. दोघांनीही विजयाचा दावा केला आहे. त्यामुळे दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मात्र १ जुलैला ठाणे येथे मतमोजणी झाल्यानंतर कोण बाजी मारणार हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे निवडणूक निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!