कोकण पदवीधर निवडणुक ; मालवण तालुक्यात ८०.९१ टक्के मतदान

भाजपा महायुतीच्या विजयाचा पदाधिकारी कार्यकर्ते यांनी व्यक्त केला ठाम विश्वास

आचरा (प्रतिनिधी) : कोकण विभाग पदवीधर मतदारसंघसाठी बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडली. मालवण तालुक्यात पाचही मतदान केंद्रावर शांततेत मतदान झाले. मालवण तालुक्यातील १८४४ मतदारांपैकी १४९२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तालुक्यात ८०.९१ टक्के मतदान झाले. अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

मालवण तालुक्यात एकूण पाच मतदान केंद्रावर मतदान झाले. यात आचरा केंद्रवर २७७ पैकी २३१, मालवण शहर तहसील कार्यालय येथे दोन मतदान केंद्र त्यापैकी एका केंद्रवर ४६३ पैकी ३६७, तर दुसऱ्या केंद्रवर ५२८ पैकी ३९२, मसुरे केंद्रवर १७० पैकी १४६, तर कट्टा केंद्रवर ४०७ पैकी ३५६ मतदारांनी मतदान केले. सर्व मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.

भाजपा महायुतीच्या विजयाचा ठाम विश्वास

मालवण केंद्र बाहेर भाजपा महायुतीच्या बुथ वर पदाधिकारी, कार्यकर्ते बहूसंख्येने उपस्थित होते. भाजप महायुतीचे उमेदवार आम. डॉ. निरंजन डावखरे यांच्या विजयाच्या ठाम विश्वास यावेळी सर्वांच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!