घरेलू कामगार नोंदणी भारतीय मजदूर संघ कणकवली कार्यालयात सुरू

कणकवली (प्रतिनिधी) : घरेलू कामगारांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देत आर्थिक संरक्षण देण्यासाठी नियमानुसार त्यांची नोंदणी शासनदरबारी कामगार आयुक्तांकडे होणे अत्यावश्यक आहे. नोंदणीकृत घरेलू महिला कामगारांना संसारोपयोगी भांडी संच तसेच वय वर्षे 55 पूर्ण झाल्यानंतर वार्षिक 10 हजार सन्मानधन शासनाकडून मिळते. घरेलू कामगारांची नोंदणी भारतीय मजदूर संघाच्या कणकवली येथील तहसीलदार कार्यालायमागिल जगन्नाथ प्लाझा येथील कार्यालयात सुरू आहे. वय वर्षे 18 ते 58 वयोगटातील महिला घरेलू कामगारांनी स्वतःचे आणि वारसाचे आधारकार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, रेशनकार्ड झेरॉक्स आणि 4 पासपोर्ट साईज फोटोसह कार्यालयात आपली नावनोंदणी करावी असे आवाहन भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष श्री. विकास गुरव यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी मोबा. 7972237402 अथवा कार्याध्यक्ष भगवान उर्फ बाळा साटम मोबा. 9423879348 यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!