विनाकारण वेळ व आर्थिक भुर्दंड यामुळे विद्यार्थी व पालक वर्गाकडून रोष व्यक्त
वैभववाडी (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामांसाठी तसेच अन्य शासकीय कारणांसाठी विद्यार्थी तसेच पालकांना जातीचा दाखला किंवा नॉन क्रिमिलियर अशा अन्य काही दाखल्यांची आवश्यकता असते त्यामुळे विद्यार्थी पालक त्यासंबंधी अर्ज वैभववाडी तहसीलदार कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रातून ऑनलाईन पद्धतीने करत आहेत. मात्र सदरच्या दाखल्यावर डिजिटल स्वाक्षरी असल्या कारणाने पुन्हा सदरचा दाखला घेऊन विद्यार्थी व पालक यांना कणकवली प्रांत ऑफिस ची वारी करावी लागत आहे.
परिणामी वेळ व आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. यामुळे विद्यार्थी व पालक वर्गाकडून रोष व्यक्त केला जात आहे. शिवाय प्रमाणपत्रावरील शिक्याची सोय तहसीलदार वैभववाडी यांच्या माध्यमातून करण्यात यावी शिक्यासहीत दाखला वैभववाडी तहसील कार्यालयातून मिळावा अशी मागणी विद्यार्थी व पालक वर्गाकडून होत आहे.