“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेची सिंधुदुर्गात प्रभावी अंमलबजावणी करणार.!

माजी जि. प. अध्यक्ष संजना सावंत यांची माहिती

प्रतेक महिन्याला 1500 रुपये देणारी महायुती सरकारची ही योजना महिलांचे सक्षमीकरण करणारी

भाजप नेते खासदार नारायण राणे,पालकमंत्री चव्हाण, आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणार

सिंधुदुर्गासाठी पाणबुडी प्रकल्प व स्कुबा ड्रायव्हिंग सेंटर हे पर्यटनासाठी पोषक प्रकल्प

कणकवली (प्रतिनिधी) : प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा होणारी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना ही, लाभार्थी महिलांना आधारवड ठरणारी योजना आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघा सह सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. माजी केंद्रीय मंत्री,खासदार नारायण राणे,पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली लाभार्थी महिलांपर्यंत पोचून या शासनाच्या योजनेचा लाभ आम्ही मिळवून देणार आहोत. ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे.अशा प्रत्येक महिलेला या योजनेत समाविष्ट करून घेणार.अशी माहिती जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ संजना सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

खासदार नारायण राणे यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या . यावेळी महिला उपाध्यक्ष संजना सदडेकर, शहर अध्यक्ष प्राची कर्पे, करंजे सरपंच सपना मेस्त्री,माजी नगरसेवक मेघा सावंत, साक्षी वाळके, नागवे सरपंच सिद्धीका जाधव, माजी नगरसेवक प्रतीक्षा सावंत, यांच्या सह भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री,तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री आदी उपस्थित होते. महायुती सरकारने राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. येणारी विधानसभा निवडणूक पाहता यावर्षीच्या अर्थसंकल्पाला विशेष महत्त्व प्राप्त झालेले होते. या अर्थसंकल्पात बेरोजगार तरुण यासोबतच शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत.अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून महाराष्ट्र राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल देखील सादर करण्यात आला होता. आणि काल अर्थसंकल्प सादर करण्यात आला.

आलेल्या अर्थसंकल्पामध्ये महिला भगिनींसाठी मोठ्या प्रमाणात योजना आणि सवलती जाहीर करण्यात आलेल्या आहेत. त्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री श्री अजित पवार, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, आमदार नितेश राणे यांचे आभार मानत असल्याची माहिती माजी जि प अध्यक्ष संजना सावंत यांनी दिली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमार्फत अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत या सह ज्या यंत्रणांमार्फत ही योजना राबविण्यात येणार त्या यंत्रणांना भाजपा पदाधिकाऱ्यांकडून सहकार्य करून योजना प्रभावीपणे राबवली जाईल असेही सावंत यांनी सांगितले.

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” या योजनेची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेली या योजनेमध्ये पात्र महिलांना दर महिन्याला 1500/- रुपये देण्यात येणार. आणि या योजनेसाठी सरकारकडून 46000 कोटी रुपयांचा भरीव तरतूद उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून 95 लाख महिलांना या योजनेचा फायदा होईल असा अंदाज आहे.महायुती सरकार वर्षाला 3 मोफत गॅस सिलेंडर देणारी अन्नपूर्णा योजना राबविण्यात येणार आहे. पर्यावरण संरक्षणाला ही योजना पोषक ठरेल आणि 52 लाख 16 हजार 412 लाभार्थी कुटुंबाला या योजनेचा लाभ होईल असं सुद्धा अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलेले आहे.

राज्यातील दहा हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी सरकारकडून निधी सुद्धा उपलब्ध करून दिला आहे. महाराष्ट्रामध्ये सहा लाखाहून अधिक महिला बचत गट कार्यरत असून त्यांची संख्या सात लाखांपर्यंत वाढवण्यात येणार. महिला उ‌द्योजकांसाठी 15 लाख रुपयांपर्यंत घेतलेल्या कर्जावरील व्याजाचा परतावा शासनाकडून करण्यासाठी आई योजना सुद्धा सुरू करणार असल्याचं सरकारने सांगितले आहे.महिला व बालकां विरोधातील अत्याचाराचे खटले चालवण्यासाठी 100 विशेष जलद गती न्यायालयांना आवश्यक निधी सुद्धा उपलब्ध करून दिला जाणार आहे.

ड्रोन दीदी आणि लखपती दीदी यादेखील योजना सुरु केल्या.सिंधुदुर्गात स्कुबा ड्रायव्हिंग सेंटर उभारणार त्यासाठी २२ कोटी रुपये, वेंगुर्ला येथे पाणबुडी प्रकल्पासाठी ४४ कोटी रुपये निधीची तरतूद केली आहे.,औ‌द्योगिक प्रशिक्षण केंद्रासाठी तरतुदी,कोकणातील कातळ शिल्पाच्या संवर्धनासाठी युनेस्कोकडे पाठपुरावा कार्यासाठी प्रयत्न करणार,शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफ करण्याची घोषणा सरकारने केलेली आहे अशी माहिती संजना सावंत यांनी दिली. यावेळी युवा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री,तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!