मुंबई (ब्यूरो न्यूज) : राज्यातील भाविकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. पावसाठी अधिवेशनात सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात महिला, शेतकरी, विद्यार्थ्यांसाठी विविध योजना आणण्यात आल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. लाडकी बहीण, विद्यार्थी शिष्यवृत्ती अशा अनेक योजनांची घोषणा काल वित्तमंत्री अजित पवार यांनी केली. या योजनांवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये काल कलगीतुरा पहायला मिळाला. दरम्यान राज्यातील भक्तांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे.
पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील भाविकांसाठी गुड न्यूज दिली आहे. अनेक ज्येष्ठ नागरिकांना इच्छा असून पैशांमुळे देवदर्शन करता येत नाही. ज्यांना परवडते ते सहकुटुंब देवदर्शनाला जातात. पण ज्यांना नाही परवडत त्यांची इच्छा अपूर्णच राहते. या भाविकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आम्ही लागू करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. लवकरच ही योजना सुरु होणार असून राज्यातील भाविकांना याचा लाभ होणार आहे. राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ घेता येणार आहे.