‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ भगिनींना आत्मनिर्भर करणारी महत्वाकांक्षी योजना
योजनेच्या 100 % अंमलबजावणी भाजपा प्रयत्नशील
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ या योजनेसारखी अत्यंत महत्वाकांक्षी आणि महिला भगिनींना दिलासा देणारी योजना महाराष्ट्र सरकारने कार्यान्वित केली यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्गच्या वतीने खूप आभार. राज्यातील महीलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्यसाठी आहार पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने अशी योजना सुरू केलेली आहे.या योजनेची अंमलबजावणी तातडीने होणार असून त्यासाठी आवश्यक कागदपत्रे जमा करून त्यासंबंधीचे अर्ज शासनाने नेमून दिलेल्या साईटवर अपलोड करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने विशेष अशी सहाय्य योजना करण्यात आलेली आहे . कारण येत्या 15 जुलैला सदरचे अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख आहे.
यातील सर्वात महत्त्वाचा असणारा उत्पन्नाचा दाखला त्वरित मिळण्यासाठी तहसीलदार कार्यालये तसेच शासनमान्य सेवा केंद्र याठिकाणी शिबिराचे आयोजन करावे अशी विनंती भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी महसूल यंत्रणेकडे केलेली आहे. महसूल अधिकारी वर्गाने सुद्धा या योजनेच्या अंमलबजावणी मध्ये कोणताही विलंब होणार नाही याची ग्वाही दिलेली आहे. तरी जिल्ह्यातील या योजनेत समाविष्ट होऊ शकणाऱ्या आमच्या भगिनींना आवाहन आहे की, या योजनेचा लाभ घेण्यासाठी कृपया आवश्यक कागदपत्रांची तातडीने पूर्तता करा, याकामी कोणतीही अडचण येत असेल तर आपल्या तालुक्यातील भाजपा कार्यालयाशी संपर्क करा, कोणत्याही भाजपा पदाधिकाऱ्यांशी, कार्यकर्त्यांशी संपर्क करा आणि या योजनेचा शंभर टक्के लाभ घ्या.