सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेचा ४१ वा वर्धापन व कृषी दिनानिमित्त कासार्डे शाखेसमोर निसर्ग मित्र परिवाराच्यावतीने वृक्षारोपण

तळेरे (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या एकेचाळीसाव्या वर्धापन आणि कृषी दिनानिमित्त जिल्हा बॅंकेच्या कासार्डे (ता. कणकवली) येथील शाखेमध्ये आज १ जुलै रोजी संध्याकाळी निसर्ग मित्र परिवार या सामाजिक संस्थेच्यावतीने वर्धापन दिनानिमित्त दोन झाडे भेट देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.त्यानंतर बॅंकेच्या प्रवेशद्वारती दोन्ही झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.

१ जून कृषी दिन तसेच सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेचा एकेचाळीसावा वर्धापनदिन याचे औचित्य साधून निसर्ग मित्र परिवाराच्या वतीने मुंबई गोवा महामार्गानजीक कासार्डे तिठ्यावरती असलेल्या जिल्हा बॅंकेच्या स्व मालकीच्या शाखेसमोरील मोकळ्या जागेत वृक्षारोपण करण्याची संकल्पना या शुभेच्छा भेटीच्या दरम्यान बॅंकेचे शाखाधिकारी सागर साटम आणि इतर सर्व कर्मचारी यांच्या समोर निसर्ग मित्र परिवाराच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली. त्यांनी शुभेच्छा स्विकारुन या उपक्रमाचे स्वागतच केले.

या भेटीच्या दरम्यान एक बदामाचे रोप भेट देऊन वर्धापनदिन दिनाच्या शुभेच्छा शाखाधिकारी सागर साटम आणि संपूर्ण कर्मचारी वर्गाला देण्यात आल्या. तसेच मैत्री मित्र परिवारातील सदस्या आणि जिल्हा बॅंकेच्या कणकवली शाखेतील कर्मचारी सौ.शेजल उर्फ वैशाली सावंत हिच्या देखील आजच्या दिवशी वाढदिवस असल्याने वाढदिवसाची आठवणीतील भेट म्हणून आणखीन एक सोनचाफ्याचे कलम भेट देण्यात आले. या दोन्ही कलमांचे निसर्ग मित्र परिवाराचे अध्यक्ष व पत्रकार संजय खानविलकर आणि बॅंकेचे शाखाधिकारी सागर साटम यांच्या हस्ते बॅंकेच्या प्रवेशव्दारावरती वृक्षारोपण करण्यात आले.

या प्रसंगी निसर्ग मित्र परिवाराचे उपाध्यक्ष व पत्रकार दत्तात्रय मारकड, खजिनदार व पत्रकार निकेत पावसकर, सदस्य व प्राथमिक शिक्षक झाकीर शेख, कासार्डे विद्यालयाचे प्रा.विनायक पाताडे, पत्रकार महेश तेली, बॅंकेचे कर्मचारी वंदना राणे, प्रशांत परब, अर्पणा गुरव, शरद बागवे, शासकीय शिक्षक पतपेढी कासार्डे शाखेचे शुभम चव्हाण आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!