नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत राज्यस्तरीय उल्हास मेळावा पूर्व तयारीची कलाशिक्षकांची एक दिवशीय कार्यशाळा संपन्न

माध्य.शिक्षणाधिकारी,प्राथ. शिक्षणाधिकारी (योजना) आणि प्राचार्य जिल्हा प्रशिक्षण संस्था जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्यावतीने कार्यशाळेचे आयोजन

कला शिक्षकांनी “प्रौढ साक्षरांना आरोग्य आणि आहार” या विषया संबंधीची शैक्षणिक साधनांचे केले सादरीकरण

वैभववाडी (प्रतिनिधी) : नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत राज्यस्तरीय उल्हास मेळावा पूर्व तयारीसाठी माध्य.शिक्षणाधिकारी, प्राथ .शिक्षणाधिकारी (योजना) आणि प्राचार्य जिल्हा प्रशिक्षण संस्था जिल्हा परिषद सिंधुदुर्ग. यांच्यावतीने जिल्ह्यातील सर्व कला शिक्षकांना दि.२ जुलै रोजी एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्रौढ साक्षरांना आरोग्य आणि आहार यासंबंधीचे मार्गदर्शन करण्यासाठी शैक्षणिक साधन निर्मितीची कार्यशाळा घेण्यात आली यामध्ये संपूर्ण जिल्ह्यातिल कलाशिक्षक या कार्यशाळेच्या निमित्ताने न्यू इंग्लिश ओरोस येथे एकत्र बोलावले होते या कार्यशाळेत या विषयाशी संबंधित भित्तीपत्रके ,त्रिमित साधने, खेळ, संगीत, कविता यांच्या माध्यमातून प्रौढसाक्षरानां आहार आणि आरोग्य यासंबंधी मार्गदर्शन करणारी शैक्षणिक साधनांची निर्मिती करण्यात आली ४० पेक्षा जास्त शैक्षणिक साधने या कार्यशाळेत तयार झाली. मा. प्राथमिक शिक्षणाधिकारी कुडाळकर यांनी सर्व कला शिक्षकांचे अत्यंत मनापासून आभार मानले.

कला शिक्षकांच्या काम करण्याच्या पद्धती बघून प्राथमिक शिक्षणाधिकारी अवाक झाले त्यांनी आपल्या भाषणात इतर कृतीसत्रामधुन तीन, चार वाजल्यापासून घरी जाण्याचे वेध लागलेल्या शिक्षकांचे किस्से सांगितले. आणि उशीरा पर्यंत आपल्या कामामुळे घरी जाण्याची घाई न करणाऱ्या कला शिक्षकांचे कौतुक केले. काही कला शिक्षकांच्या मोठ्या कलाकृती पुर्ण करण्यासाठी जादा वेळ देऊन ९ जुलै पर्यंत कार्यालयात जमा करण्यासंबंधी सुचना देण्यात आल्या. या कृतीसत्रास सिंधुदुर्ग जिल्हा कलाध्यापक संघाच्या सर्व कार्यकारिणीच्या सदस्यांचे उत्तम सहकार्य लाभले.सकाळच्या सत्रात माध्य.शिक्षणाधिकारी कविता शिंपी मॅडम यांनी कला शिक्षकांना मार्गदर्शन केले. या वेळी नाईक मॅडम उप शिक्षणाधिकारी (योजना ) डाएटच्या प्राचार्या तसेच न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक उपस्थित होते. कार्यशाळेतील शैक्षणिक साधनांचा स्टॉल पुढील महिन्यात आयोजित होणाऱ्या उत्सव समारंभात लावला जाणार आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी यांनी यावेळी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!