वैभववाडी (प्रतिनिधी) : राज्य सरकार वर ८ लाख कोटी कर्ज असताना तुटी चा अर्थ संकल्प करताना , केवळ विधानसभा निवडणुकीत, लोकक्षोभेची तूट भरून काढण्यासाठी लाडकी बहीण योजना अंतर्गत १५०० रू चे प्रतिमाह सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली. मात्र तरुण बेकारी च्या विळख्यातून सुटताना दिसत नाही . म्हणजे भावाला कडकी आणि बहिनीं ला दिडकी असे झाले आहे. खरतर, कागदपत्र जमवण्यासाठी महीलाची त्रेधातीपट होत असताना दिसत आहे. आधीच, अंगण वाडी सेविका, आशा सेविका चे प्रश्न प्रलंबित आहेत. शिक्षिकाचे पगार वेळेवर मिळत नाहीत. निधी अभावी सरकारी रुग्णालयात औषध उपलब्ध नाहीत. गॅस पासून सर्व जीवन आवश्यक वस्तूची दरवाढ होऊन माहगाई गगनाला भिडली असताना. केवळ मतांवर डोळा ठेवून अश्या योजना तून जनतेला परवलंबना ची सवय लावणे म्हणजे आत्म निर्भर चा विचकां करणे सारखे आहे. जनते साठी हि भिक म्हणजे करदात्या चे मूलभूत विकासकामांची बोंब आहे , असे चित्र उद्या स्पष्ट होताना दिसेल. तसेच , सेवेत निकृष्टता दिसून येणार. म्हंजे आवळा द्याचा आणि कोवळा घ्याचा..असेच सरकारचे धोरण असणार आहे का? .. अशी टीका उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा कार्यकारणी सदस्य संदीप सरवणकर यांनी लाडकी बहीण या सरकारी योजनेवर केली .
डोक्यावर कर्ज आठ लाख कोटी, जेथे भावाला कडकी तेथे ₹ १५००/- लाडक्या बहिणीसाठी – संदीप सरवणकर












